आदर्श आनंद शिंदे
आदर्श शिंदे यांचा जन्म : ७ मार्च, इ.स. १९८८ मध्ये मुंबई (महाराष्ट्र - भारत) इथे झाला. हे एक मराठी गायक आहेत. हे भीमगीतांसाठी प्रसिद्ध असून त्यांनी अनेक लोक गीते व चित्रपट गीतेही गायली आहेत. त्यांच्या आईचे नाव विजया शिंदे तर वडिलांचे नाव आनंद शिंदे आहे तसेच ते देखील सुप्रसिद्ध गायक आहेत.Adarsh Shinde Mahiti
◆ वयक्तिक जीवन
आदर्श शिंदे हे एका समृद्ध गायनपरंपरा असलेल्या कुटुंबातून आले आहेत. पार्श्वगायक आनंद शिंदे हे त्यांचे वडील, मिलिंद शिंदे हे काका आणि गायक प्रल्हाद शिंदे हे त्यांचे आजोबा होत.आदर्श शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणे शिकायला सुरुवात केली. त्यांनी सुरेश वाडकर यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील धडे घेतले आहे. आदर्श शिंदेंनी 27 मे 2015 रोजी नेहा लेले सोबत मुंबईत बौद्ध पद्धतीने विवाह केला. त्यांना अंतरा नावाची मुलगी आहे.
◆ सातवीत पाहिले रेकॉर्डिंग
आदर्श आणि उत्कर्ष या बंधूंना गाता गळा असल्यामुळे लहानपणापासून वडिलांसोबत महाराष्ट्रभर गाण्याची संधी मिळाली. बालवयापासूनच त्यांनी रेकॉर्डिंगही सुरु केले होते. आदर्शचा भाऊ उत्कर्षने 'दिव्य मराठी डॉट कॉम' सोबत बोलताना सांगितले की, आम्ही दोघांनी वडिलांकडूनच गाणे शिकले. आदर्श आणि उत्कर्ष यांचे पहिले रेकॉर्डिंग देखील सोबतच झाले होते. आदर्श सातवीत असताना त्याने 'सपना' या अल्बमसाठी पहिले गाणे गायले. त्याने मराठीसह सुनिधी चौहान, शाल्मली खोलगडेसोबतच अनेक हिंदी गायकांसोबत ड्युएड गायले आहे.◆ कारकीर्द
आदर्श शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या आणि काका मिलिंद शिंदे यांच्यासोबत अल्बममध्ये गायन करून करिअरची सुरुवात केली. ‘स्टार प्रवाह’ या दूरचित्रवाणीवरील ‘आता होऊन जाऊ द्या’ या रियालिटी शोमध्ये भाग घेतल्याने लोक त्यांना ओळखू लागले.सन २०१४ मध्ये "शिंदे" कुटुंबाने प्रियतमा या चित्रपटासाठी एकत्र गायन केले. तीन पिढ्यांचे एकत्र पार्श्वगायन ही मराठी चित्रपट क्षेत्रातील घडलेली पहिलीच घटना होती. आदर्श शिंदे यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये १५०० हून अधिक गाणी गायली आहेत.
हे सुद्धा वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◆ शिंदे शाही
वडील आनंद आणि अजोबा प्रल्हाद शिंदे यांनी महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळ गतीमान करण्यासाठी अनेक बुद्ध-भीमगीते गायली आहेत. वडिलांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात भीमगीते आणि मैफली त्यांनी गाजवल्या. आदर्श आणि त्याचा भाऊ उत्कर्ष यांनी 'शिंदे शाही' नावाने स्वतःचा ऑर्केस्ट्रा सुरु केला आहे. यातून ते प्रेक्षकांसाठी अनेक सुरेख मैफिली सजवत असतात.◆ आदर्शची गाजलेली गाणी
- काफिराना (जोकर)- आला आला रे बाजी (बाजी)
- देवा तुझ्या गाभार्याला उंबराच नाही (दुनियादारी)
- महाड-निशीक-मुबई-पुण्याला भीमराव कडाडला
- डाव कसा मोडला (वाक्य)
- मॅटर झाला (मॅटर)
- अंबे कृपा करी (वंशवेल)