adsense

रतन टाटा यांचे जीवनचरित्र - Ratan Tata Biography in Marathi

रतन टाटा

         जगातील सर्वात छोटी कार बनवून जगभर प्रसिद्ध झालेले रतन टाटा हे भारतातील एक अतिशय प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. ते श्री जमशेदजी टाटा यांचे नातू आहेत. ते टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या सर्वात मोठ्या भारतीय संघटनेचे माजी अध्यक्ष होते. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या काही प्रमुख कंपन्या त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. सध्या रतन टाटा टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. रतन टाटा अजूनही अविवाहित आहेत. 

Ratan Tata Biography in Marathi
Ratna Tata Mahiti

      रतन टाटा एक अतिशय शांत आणि लाजाळू स्वभावाचे आहेत. त्यांच्याबद्दल विशेष म्हणजे ते जगाच्या खोट्या दिखाव्यांमध्ये  विश्वास ठेवत नाहीत. रतन टाटा उच्च विचारांचे व उच्च व्यक्तिमत्व असलेले मनुष्य आहेत. रतन टाटा म्हणतात की व्यवसायाचा अर्थ नफा मिळवणे नव्हे तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय.

◆ बालपण आणि सुरुवातीचे जीवन

       रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई येथे  एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनू टाटा होते. नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा होते. रतन टाटा हे त्यांचे दत्तक घेतलेला मुलगा होता. जमशेदजी टाटा हे टाटा कंपन्यांचे संस्थापक होते.

     1948 मध्ये रतन टाटा दहा वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचे घटस्फोट झाले आणि त्यानंतर, त्यांचे पालनपोषन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले. त्यांनी चॅम्पियन स्कूल, मुंबई येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि आर्किटेक्ट होण्याच्या इच्छेने रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही काम केले.

      1959 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1975 मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही मिळवली. 

◆ व्यावसायिक कारकीर्द

      1962 मध्ये, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टाटा स्टील विभागातून केली, जिथे त्यांनी ब्ल्यू कॉलरच्या कर्मचाऱ्यांसह भट्टीमध्ये काम केले. हे एक कठीण काम होते. टाटा समूहाच्या परंपरेनुसार 1970 पर्यंत त्यांनी टाटा समूहातील बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांना मॅनेजमेंट मध्ये प्रोमोट केले गेले.

    1971 मध्ये त्यांची राष्ट्रीय रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड (नेल्को) चे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुढच्या 3 वर्षात कंपनीला चांगला ग्राहक मिळवून दिले आणि नेल्को चे शेर 2% वरून 20% वाढवले. परंतु देशात लागू झालेली आणीबाणी आणि आर्थिक मंदीमुळे नेल्को कंपनीला बंद करण्यात आले. रतन टाटा यांच्या जीवनातील हा सर्वांत मोठा अपयश होता.

    1975 मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही मिळवली. याच दरम्यान टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली.

    1977 मध्ये, त्यांना एम्प्रेस मिलची जबाबदारी देण्यात आली. जी बंद होण्याच्या मार्गावर होती. त्यांनी गिरणीसाठी आराखडा प्रस्तावित केला परंतु टाटाच्या अन्य अधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला आणि नंतर ही कंपनी देखील बंद झाली. रतन टाटा यांना दुसऱ्यांदा अपयश सहन करावा लागला. परंतु यातून त्यांना बरेच काही शिकता आले.

◆ विकत घेतल्या  Jaguar आणि Land Rover

      1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीज चे अध्यक्ष बनवले गेले. 1991 मध्ये जे.आर.डी. टाटांनी त्यांना टाटा समूहाचे नवे चेअरमन म्हणून नियुक्त केले. त्यांनतर टाटा समूह अधिक वाढु लागला. टाटा आधीपासूनच व्यावसायिक व प्रवासी वाहन बनवत होती, परंतु भारतातील सामान्य जनतेची समस्या लक्षात घेत 30 डिसेंबर 1998 मध्ये इंडिका कार बाजारात आणली. रतन टाटा यांनी या पुक्रमावर खूप मेहनत घेतली होती पण automobile analysis ने गाडीतील दोष काढले. त्यामुळे टाटा इंडिकाच्या विक्रीवर परिणाम झाला. आणि एका वर्षांतच टाटा इंडिका फ्लॉप ठरली, टाटा मोटोर्सला खूप तोटा सहन करावा लागला.

Ratan Tata Biography in Marathi
Ratan Tata information in Marathi

       यामुळे रतन टाटा यांनी कार कंपनी विकण्याचा प्रस्ताव फोर्ड कंपनी समोर मांडला. तत्कालीन फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचा अपमान केला. “जर तुला कार बनवता येते नव्हते तर तुला या व्यवसायात उतरायला कोणी सांगितले होते.” रतन टाटा यांनी या अपमान बदला घेण्यासाठी सर्व संपत्ती टाटा मोटोर्समध्ये गुंतवली आणि टाटा इंडिका V2 बाजारात उतरवली. काही वर्षे चढ उतार सहत टाटा मोटोर्सने पुन्हा आपले नाव उभे केले.

       याच दरम्यान फोर्ड कंपनी आपल्या Jaguar आणि land Rover मुळे बंद होण्याच्या मार्गावर होती. 2008 मध्ये रतन टाटा यांनी Jaguar आणि Land Rover विकत घेण्याचा प्रस्ताव फोर्ड कंपनी कडे मांडला. बिल फोर्ड यांनी या प्रस्तावाला आनंदाने स्वीकार केले आणि  रतन टाटा यांना म्हणले तुम्ही कंपनी विकत घेऊन आमच्यावर खुप उपरकार करत आहात. त्यावेळी रतन टाटा सुद्धा त्यांना अपमानित करू शकत होते , परंतु हाच फरक असतो एका यशस्वी आणि महान व्यक्तीमध्ये जे त्यांना इतरांपासून वेगळे बनवतात.

◆ यशस्वी कारकीर्द

       Jaguar आणि Land Rover सारखेच रतन टाटा यांनी बऱ्याच कंपन्या विकत घेतल्या त्यात 2000 मध्ये टेंटली ला विकत घेतले आणि जगातील सर्वात मोठी टी बेग्ज बनवणारी कंपनी निर्माण केली. 2004 मध्ये साऊथ कोरिया मधील Daewoo Commercial Vehicle ला रतन टाटा यांनी विकत घेतले. 2007 मध्ये टाटा ने लंडनमधील Corus Group ही स्टील कंपनी विकत घेतली. नंतर तिचे नाव Tata Steel Europe ठेवण्यात आले.

◆ सर्वात स्वस्त दरात कार

       मानवी विकासाबरोबरच भारतीयांचे जीवनमान वाढविणे हे त्याच्या जीवनाचे मुख्य लक्ष्य होते. 2008 मध्ये रतन टाटा यांनी सामान्य कुटुंबासाठी Tata Nano ही कार बाजारात आणली. सुरुवातीला ही कार खूप मोठ्या प्रमाणात चालली, परंतु बाजारात या कारच चित्र एका स्वस्त गाडीत निर्माण झाल्यामुळे पुढे टाटा नॅनो ही फ्लॉप झाली.

     इंटरनेट ची ताकद ओळखून त्यांनी बऱ्याच कंपन्यात गुंतवणूक केली. ज्यात Ola cab, paytm, Xiomi, Snap deal, zivame, cashkaro.com, lenscart.com, cardekho.com इत्यादी. 

28 डिसेंबर 2012 साली 75 व्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून राजीनामा दिला.

◆ वैयक्तिक जीवन

    रतन टाटा हे अविवाहित आहेत. ते आपल्या साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात. ते मुंबईत एका साध्या घरात राहतात आणि टाटा सेडान ही कार चालवतात. त्यांना प्राण्यांची तसेच पुस्तके वाचण्यासाची आवड आहे.

Ratan Tata Biography in Marathi
Ratan Tata with Dog

   रतन टाटा यांनी आपल्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत आपल्या कंपनीचे महसूल 40% वाढवले आणि नफा 50% पर्यंत वाढवले. आज टाटा समूहचया 100 पेक्षा अधिक कंपन्या आहेत ज्या 150 पेक्षा अधिक देशात सक्रिय आहेत. ज्यात 7 लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. देशा प्रति असलेल्या प्रेमामुळे टाटा समूह आपल्या नफ्यातील 66% दान करते. रतन टाटा यांना बऱ्याच पुरस्काराने गौरविण्यात आले ज्यात 2000 मध्ये पद्यभूषण आणि 2008 मध्ये भारतातील दुसरा मोठा पुरस्कार पद्यविभूषण देण्यात आले.


रतन टाटा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आवडल्यास नक्की शेयर करा..

✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳