सुनीत जाधव Bodybuilder
Biography मराठी मध्ये जाणून घेणार आहोत एका मराठी बॉडीबिल्डर विषयी कशा प्रकारे डायटला पैसे नव्हते म्हणून बायकोचे दागिने गहाण ठेवायला लागणाऱ्या या युवकाने मिस्टर एशिया हा किताब मिळवला. सुनीत जाधव ने तब्बल 23 वर्षानंतर भारताला मिस्टर एशिया हे पदक मिळवून दिले. त्यांनी आता पर्यंत दोन वेळा महाराष्ट्र श्री, तीन वेळा मिस्टर इंडिया आणि 2018 ला मिस्टर एशिया हे कप जिंकले आहेत.
Sunit Jadhav Mahiti |
सुनीत जाधव यांचा जन्म 21 डिसेंबर 1992 रोजी मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला. सुनीतचे शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण झाले. शाळेत असताना सुनीतची शरीरवृष्टी खूप बारीक आणि उंच अशी होती. सुनीतला व्यायामाची तेव्हा ठेवठी आवडही नव्हती. परंतु त्याचे वडील तेव्हा व्यायाम करत असत. जेव्हा सुनीत ची दहावीची परीक्षा झाली तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितले या सुट्टी मध्ये जिम लाव व या सुट्ट्या मध्ये शरीर बळकट बनव सुट्ट्या वाया घालवू नको. वडिलांचे बोलणे ऐकून सुनीत यांनी जिम लावली खरी पण त्याला जिम मध्ये जाण्यास खूप कंटाळा येत असे. व्यायाम केल्याने अंग दुखायचे म्हणून कॉलेज सुरू होण्या आधीच त्यांनी जिम सोडली आणि ठरवलं की पुन्हा काही जिम लावायची नाही असे ठरवले.
सुनीतला याची जाणीवही नव्हती की तो पुढे जाऊन बॉडी बिल्डिंगमध्येच करियर करणार आहे आणि बॉडी बिल्डिंग मधेच भारताला गोल्ड मेडल जिंकून देणार आहे. जिम सोडल्या नंतर काही दिवसानंतर सुनीतचे कॉलेज सुरू झाले. कॉलेजमध्ये त्याने अनेक सिनियर मुले बघितली की त्यांची बॉडी चांगली होती. सुनीतला त्यांची पर्सनॅलिटी खूपच आवडली आणि सुनीत ने ठरवले पुन्हा जिम लावायची व बॉडीबिल्डर सारखे शरीर बनवायची. तेव्हा स्पर्धेत सहभागी होयचे आणि मेडल जिंकायचं अस सुनीतचे काही उद्देश नव्हतं. निव्वळ चांगली शरीरवृष्टी बनवाची म्हणून त्याने जिम लावली आणि तो व्यायाम करू लागला. त्यांच्या कुटुंबीयांनि त्याला खूप प्रोत्साहन दिले. योग्य प्रकारे व्यायाम व आहार घेतल्याने सुनीतला 4 महिन्यातच चांगला Result मिळू लागला. अवघ्या सहा महिन्यात त्याची बॉडी चांगली झाली. त्यानंतर स्थानिक स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले, ती स्पर्धा होती टॉप 10 या स्पर्धेत सुनीतला 9 वा क्रमांक मिळून देखील खूप खुश होता. त्याने अजून चांगली मेहनत करण्याचे ठरवले व अनेक लहान मोठ्या स्पर्धेत सहभागी होऊन चांगले प्रदर्शन केले.
Sunit Jadhav with Wife |
सुनीतला चांगली सुरुवात मिळाली ती मुंबई श्री मध्ये ही स्पर्धा लोकप्रिय व मानाची ठरली जाते. त्यात त्याने त्याच्या वजन गटात गोल्ड मेडल मिळवले. मुंबई श्रीच्या यशानंतर त्याने याच क्षेत्रात करीयर करण्याचे ठरवले. मुंबई श्री जिंकल्यामुळे तो महाराष्ट्र श्री साठी पात्र झाला. त्यानंतर सुनीतने महाराष्ट्र श्री मध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावला. याच काळात सुनीतच स्वप्नाली जाधव हिच्याशी लग्न झाले. स्वप्नालीने त्याला खुप सहकार्य केले. त्याच्या डायटवर लक्ष देण्यासाठी तिने जॉबही सोडला. त्यानंतर तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या त्यामुळे तो Mr. India साठी qualify झाला. ही स्पर्धा खेळायला जिम डायट यावर खूप खर्च येतो. आर्थिक परिस्थिती लक्षात घेता सुनीत तेवढं खर्च उचलू शकत नव्हता. पण म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, त्याच प्रमाणे स्वप्नालीने देखील सुनीतला खुप साथ दिली. तिने तिचे दागिने गहाण ठेऊन सुनितच्या जिम व डायटच्या खर्चावर हातभार लावला. सुनीतने ही खुप मेहनत घेऊन 2016 मध्ये Mr. India हा किताब मिळवला. त्याच्या या यशानंतर सुनीत जाधव या नावाची चर्चा भारतभर होऊ लागली.
सुनीतची Mr. Asia साठी भारताकडून निवड करण्यात आली. त्या स्पर्धेत त्याने bronze पदक पटकावला. पण त्याने ठरवले होते की Mr. Asia या स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून देणार. त्याने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. स्पर्धेच्या काही महिन्याआधी त्याचे वडील आजारी पडले व त्यांना ट्युमर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सरावासाठी दूर असल्याने त्याला वडिलांना भेटता आले नाही. पुढील महिन्यात झालेल्या Mr. India मध्ये गोल्ड मेडल मिळवून वडिलांना खुश कले. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या Mr. Asia मध्ये भारताला तब्बल 23 वर्षांनंतर Gold medal मिळवून दिले.
सुनीत जाधव यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आवडल्यास नक्की शेयर करा..
✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳