विश्वास नांगरे पाटील
आपल्या भाषणामधुन लाखों मुला-मुलींना मार्गदर्शन करणारे, २६/११च्या ताजच्या दहशतवादी हल्ल्यात साक्षात मृत्यूला आलिंगन देणारे, निधड्या छातीचे, कार्यक्षम व उत्तम पोलिस अधिकारी, म्हणून प्रख्यात असणारे IPS विश्वास नांगरे पाटील कसे घडले हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. खरं ना! चला तर मग अश्याच कर्तबगार, रूबाबदार व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊया!
Vishwas Nangare Patil Information in Marathi
विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९७३ ला सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड या छोट्याशा गावात झाला. वारणेच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत वसलेले हे हिरवेगार गाव, गावाच्या तीनही बाजूने नदी वाहते त्यांचे लहानपण अगदी खेडेगावातील सामान्य कुटूंबातील मुलांप्रमानेच गेले. जसे आंब्याच्या, जांभळाच्या झाडावर चढणे, नदीला जाऊन मासे पकडणे, शाळेतून घरी आल्यावर म्हशीच्या धारा काढणे. त्यांचे वडील नावाजलेले पहिलवान त्याचबरोबर गावचे सरपंच होते. त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती कि विश्वासने चांगला पहिलवान व्हावे. पण तालमीत त्यांचे मन रमले नाही म्हणून वडिलांनी त्यांना शाळेत शिकायला पाठविले. शाळेत पाहिलवानाचा मुलगा सरपंचाचा मुलगा म्हणून दादागिरी करायचे. वर्गशिक्षकाच्या खुर्चीवर बसायचे. हा पाहिलवानाचा मुलगा सरपंचाचा मुलगा उगाच कशाला नादाला लागायचे म्हणून शिक्षक सुद्धा दुर्लक्ष करायचे. सुरवातीला ५ वी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावच्या शाळेतच झाले.
ते ६ वीला असताना शाळेत एक नवीन बाई येणार होत्या. ते नेहेमीप्रमाणे वर्ग शिक्षकाच्या खुर्चीत बसले होते. हातात छडी घेऊन दादागिरी चालू होती. मग कदम नावाच्या बाई वर्गात आल्या त्यांनी विश्वास यांच्याकडे बघितले. त्या खुर्ची जवळ आल्या तरी विश्वास उभे राहिले नाहीत. त्यांनी २ कानाखाली लावल्या आणि म्हणाल्या तू स्वतःला काय समजतोस, सरपंचाचा मुलगा, पाहिलवानाचा मुलगा असाच मोठा होशील गावगुंड होशील आणि किड्या मुगी सारखा जगशील आणि मरून जाशील. तुझे स्वतःचे अस्तित्व काहीच नसेल. त्यानंतर ते शब्द त्यांच्या मनाला इतके लागले. त्यांना लक्षात आले आपले काहीतरी चुकते आहे. मग घरी गेले आणि वडिलांना म्हणले मला शाळेत नाही जायचे. मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. वडिलांनी त्यांना समजून सांगितले शाळा शिकूनच ओळख बनविता येते. मग ते म्हणले मी या गावातल्या शाळेत जाणार नाही मी तालुक्याच्या शाळेत जाणार. मग वडिलांनी त्यांच्या म्हणण्या प्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल बत्तीस शिराळा इथे त्यांना ऍडमिशन घेतले.
हि शाळा गावापासून १८ किलोमीटर लांब होती. त्यांना बसने जायला १.५ तास लागायचा सकाळी ८ च्या बस ने जायचे व संध्याकाळी ५ च्या बसने परत यायचे. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचे वडील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन पंचायत समितीचे सभापती झाले. विश्वास दहावीला असताना त्यांचे पी.टी चे शिक्षक गायकवाड सर यांनी बघितले कि विश्वास हा मुलगा हुशार आहे. ७० ते ७५ % पर्यंत मार्क्स सुद्धा मिळवतोय. पण त्याचा येण्या जाण्यात खूप वेळ वाया जातोय. ते शिक्षक विश्वास ला म्हणाले तू माझ्या घरी रहा त्यामुळे तुला अभ्यास करायला जास्त वेळ मिळू शकेल. त्याप्रमाणे ते सरांच्या घरी राहायला गेले व रोज सकाळी ३:३० ते ८:३० वाजेपर्यंत अभ्यास करत राहिले. त्याचा परिणाम असा झाला १९८८ ला १० विच्या परीक्षेत त्यांना ८८ % गुन मिळाले व ते तालुक्यात पहिले आले. ते फक्त शक्य झाले गायकवाड सरांमुळे. मग पुढे जाऊन ११ वी सायन्स ला कोल्हापूर येथील न्यू कॉलेजला ऍडमिशन घेतले.
१२ वी ला असताना त्यांच्या कॉलेज मध्ये एक व्याख्यान आयोजित केले होते. त्यांच्या कॉलेजचे भूषण गगराणी हे IAS मध्ये भारतात ३ रे ते सुद्धा मराठी साहित्य व मराठी माध्यमातून परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले होते. तेव्हा त्यांना समजले कि कलेक्टर बनविणारी SP बनविणारी परीक्षा मराठी मधून देता येते. त्याचबरोबर मराठी साहित्य विषय घेऊन देता येते. हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले आपल्याला सुद्धा असे काहीतरी करता येईल. असे विचार त्यांच्या मनात फिरू लागले. या परीक्षेसाठी काय तयारी करावी लागते त्याची माहिती मिळवू लागले. १२ वी चा निकाल लागला. विश्वासला ९२% च्या जवळपास मार्क पडले. त्यांना गव्हमेंट इंजिनियरिंग कॉलेजला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ला ऍडमिशन मिळाले नाही. त्यांच्या भावालासुद्धा १२ वीत ८९ % मार्क्स मिळून पण MBBS ला ऍडमिशन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी ठरवले कि आपण इंजिनियरिंग मेडिकल करायचे नाही. आपण आर्टस् ला जायचे. त्या दोघांचे पालक कमी शिकलेले असल्याने घरून त्यांना विरोध झाला नाही.
त्यांनी ठरवले IS, IPS, डेप्युटी कलेक्टर DYSP नाहीतर फौजदार ची परीक्षा द्याची कुठे ना कुठे आपण सिलेक्ट होऊ. अशाप्रकारचा शांत डोक्याने दोघांनी पुढील ३ वर्षाचा प्लॅन तयार केला. मग कॉलेजला BA ला असताना NNC चे सर्टिफिकेट, NCC च्या माध्यमातून शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल त्यांना मिळवायचे होते. NSS च्या माध्यमातून मास लीट्रसी, रुलर रीकन्स्ट्रक्शन चे कॅम्प ऑर्गनाईज केले. अशा अनेक कार्यामध्ये भाग घेतला. अभ्यासासाठी पुस्तके मिळविणे कठीण होत कारण ती महाग होती. त्यांच्या संस्थेत तेवढी पुस्तके पण न्हवती.
त्यांनी गावात एक स्टडी सेंटर बनविले. सहकारी संस्थांकडून मदत जमा केली. त्यांच्या गावचे आमदार शिवाजीराव देशमुख यांनी १ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मधून मिळवून दिले. मग जवळपास २ ते अडीच लाख रुपये जमा झाले. त्यातून त्यांनी दिड लाखाची पुस्तके व १ लाखाची छोटी इमारत उभी केली. पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना पुढच्या दिशा समजू लागल्या. त्याचदरम्यान त्यांचे ग्रेजुएशन पूर्ण झाले.
BA ला त्यांना गोल्ड मेडल मिळाले. मग मुंबई ला SIC ला ऍडमिशन मिळले तिकडे ६ महिने अभ्यास केला. UPSC पहिल्याच अटेम्प्टला प्रीलियम ला नापास झाले. UPSC बरोबर MPSC ची परीक्षा सुद्धा दिली होती. तिकडे पहिली प्रीलियम पास झाले. मग मुख्य परीक्षा हि पास झाले. इंटरव्हियु मध्ये त्यांचे सिलेक्शन झाले नाही त्याचे कारण त्यांना सांगण्यात आले कि तुम्ही हि जवाबदारी स्वीकारण्यासाठी अजून खूप तरुण अहात. ते खूप निराश झाले. मग डिप्रेशन आले. १९९६ चे ते वर्ष त्यांच्या आयुष्यातील बँड पॅच होता. त्यांनी अभ्यास सोडून पॉलिटिक्स
मध्ये जाण्याचा विचार देखील केला. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले आणि प्रोच्छाहन दिले. तू नापास झाला आहे ना तू स्वतःला सिद्ध कर अभ्यास कर अजून मेहनत घे. मग त्यांनी वडिलांचे ऐकून १९९७ ला पुन्हा मुंबईला येऊन अभ्यासाला जोमाने सुरवात केली. आणि ९ महिने खूप तळमळीने अभ्यास केला. मग MPSC मधून डेप्युटी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर PSI अशा १३ परीक्षा या ८ महिन्यांच्या काळात नॉनस्टॉप पास होत गेले. त्यांचा इंटरव्हियु दिल्लीच्या धोलपूर हाऊस मध्ये झाला. त्यावेळी त्यांना टाय ची गाठ सुद्धा बांधता येत न्हवती. इंग्रजी सुद्धा नीट बोलता येत न्हवते. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांनी त्यांचा इंटरव्हियु घेतला. इंटरव्हियुमध्ये त्यांना घाशीराम कोतवाल बद्दल प्रश्न विचारला गेला. त्याच बरोबर त्यांना हिंदी मधून शेवटचा प्रश्न विचारला गेला "विश्वास इस दुनिया मे तुम क्यू आये हो? याचे उत्तर त्यांनी असे दिले "या ठिकाणी संघर्ष करायला आलो आहे. आतापर्य प्रतिकूल परिसथितीशी संघर्ष करत मी इथंपर्यंत आलोय आणि आता तुम्ही जर मला संधी दिली तर सिस्टीम मधल्या वाईट गोष्टींशी संघर्ष करायची माझी इच्छा आहे." आणि हेच उत्तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांना आवडले असावे. त्या इंटरव्हियु मध्ये सगळ्यात जास्त ३०० पैकी २१० मार्क्स मिळाले. १९९७ ला त्यांचे IPS मध्ये सिलेक्शन झाले तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त बी ए (इतिहास) पर्यंत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथून पूर्ण झाले होते. मग त्यानंतर सर्विस मध्ये असताना MA एक्स्टर्नल केले.
लातूर ला SP, नांदेडला ऍडिशनल SP असताना LLB पूर्ण केलं. ट्रेनिंग च्या काळामध्ये उस्मानी युनिव्हर्सिटी हैद्राबाद येथून MBA पूर्ण केले. १९९७ ला वयाच्या २३ व्या वर्षी एकाच वर्षात डेप्युटी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्सपेक्टर आणि आई.पी.एस या MPSC, IPSC आणि UPSC मधून ३ पोस्ट एकाचवेळी मिळवल्या.
२६/११ चा मुबंई वरती दहशदवादी हल्ला झाला तेव्हा ताजमहाल हॉटेलमध्ये सोबत फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर बुलेटप्रुफ जाकीट नसतांनाही ते ताजमध्ये शिरले. प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत गेले. दुसर्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूम मधून सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले. सकाळी सात वाजेपर्यंत त्यांनी हॉटेल मधून १३५० लोकांना सुरक्षित बाहेरकाढून त्यांचे प्राण वाचवले. त्यांचा हा पराक्रम बघून भारत सरकारने २०१३ ला त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक देऊन गौरव केला.
विश्वास नागरे पाटील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आवडल्यास आपल्या मित्र-परिवारांना नक्की शेयर करा !