सत्या नाडेला
Satya Nadella Information in Marathi |
२०१४ पासून सत्या नाडेला जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. नुकतीच त्यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
सत्या नाडेला यांचा जन्म हैदराबादमध्ये 1967 साली झाला. त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी, तर आई संस्कृतच्या प्राध्यापिका होत्या.
त्यांचं सुरुवातीचं शिक्षण हैदराबादमध्येच झालं. त्यानंतर त्यांनी मनिपाल विद्यापीठातून आयटी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले.
१९९२ मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले. त्याआधी त्यांनी सन मायक्रोसिस्टममध्ये काम केले होते. २००० मध्ये ते मायक्रोसॉफ्ट सेंट्रलचे उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट बिझनेस सोल्यूशन्सचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन सर्व्हिसेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली.
२०१४ मध्ये ते कंपनीचे सीईओ झाले. जेव्हा त्यांनी हे पद सांभाळले तेव्हा कंपनी समोर मोठ्या प्रमाणात संकटं निर्माण झाली होती. नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टला केवळ या संकटांतून बाहेर काढले नाही तर नवीन उंचीवर नेले.
नाडेला यांनी क्लाउड कम्प्युटिंगला प्राधान्य दिलं. म्हणूनच त्यांना 'क्लाऊड गुरु' असंही म्हटलं जातं. त्यांनी डेटा सेंटर्समधून सॉफ्टवेअर्स आणि सर्व्हिसेस रेंटवर उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आला. शिवाय त्यांनी कंपनीत मोठे संघटनात्मक बदल केले.
नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सातपटीहून अधिक वाढली आणि कंपनीची मार्केट कॅप २ ट्रिलियन डॉलर्सच्यावर पोहोचली. बिल गेट्स आणि जॉन थॉम्पसन यांच्यानंतर नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे तिसरे अध्यक्ष होतील.
सत्या नाडेला यांचं मानधन ३२९ कोटी रुपये (४४ मिलियन डॉलर्स) म्हणजेच २७.४४ कोटी रुपये प्रति महिना इतकं प्रचंड आहे.