भारतातील टॉप रिअल इस्टेट कंपनी DLF चे अध्यक्ष
कुशल पाल सिंग
Kushal pal singh information in marathi |
कुशल पाल सिंग यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1931 रोजी उत्तरप्रदेश मध्ये झाला. सासरे चौधरी राघवेंद्र सिंग यांनी १९४६ मध्ये स्थापन केलेल्या दिल्ली लॅण्ड अँड फायनान्स लिमिटेड (DLF) या कंपनीला त्यांनी भारतातील १० सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक बनवले.
त्यांनी मेरठ कॉलेज मधून विज्ञान विषयाची पदवी घेतल्यानंतर युनायटेड किंगडममध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात एलिट कॅव्हलरी रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून काम केले.
सिंग यांच्या नेतृत्वाखाली गुडगाव येथील जवळपास तीन हजार एकर जमीन संपादन केली गेली आणि DLF ने त्याच्यावर व्यवसायिक आणि निवासी इमारती बांधल्या.
१९९० मध्ये जनरल इलेक्ट्रिक या पहिल्या आंतरराष्ट्रीय कंपनीने DLF सिटी मध्ये जागा भाड्याने घेतली. यानंतर DLF सिटी ही भारतातील अग्रगण्य आऊटसोर्सिंग डेस्टिनेशन म्हणून उदयाला आली.
२००७ साली कंपनीचा आयपीओ आला, जो त्या काळातील भारतातील सर्वात मोठा आयपीओ होता.
२००८ साली ते जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या स्थानावर होते. २०१० साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.