adsense

ड्वेन जॉनसन - द रॉक : Dwayne Johnson Biography in Marathi

ड्वेन डगलस जॉनसन 'The Rock'


the rock information in marathi
The Rock Mahiti Marathi


अभिनय आणि कुस्तीच्या विश्वात Dwayne Johnson  'द रॉक' यांनी आपले नाव खडतर मेहनतीने आणि परिश्रमाने कमावले आहे. त्यांच्या या परिश्रमातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल की कितीही कठीण परिस्थिति असो जर तुम्ही मेहनत आणि संयम ठेवून कोणतेही काम अथवा करियर वर लक्ष दिल्यास यश ही नक्की मिळते,


द रॉक हा जगातील अव्वल दर्जाचा अभिनेता कसा बनला? 

द रॉकचा जन्म २ मे १९७२ मध्ये कॅलिफोर्नियातिल कुस्ती प्रिय कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यवसाइक कुस्ती पेलहवान होते, त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य पेलहवान होते. द रॉक यांचे बालपण हवाई आणि न्युझीलँड मध्ये गेले. त्यानंतर ते पुनः यूएसला परतले. 

हायस्कूलमध्ये असताना रॉक पेनसिल्व्हेनियामध्ये फुटबॉल खेळायचा, फुटबॉलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनी  यूनिवर्सिटी ऑफ मियामी मधून कॉलरशिप सुद्धा मिळवली.


एका मुलाखती दरम्यान द रॉक ने सांगितले की ते 14 वर्षांचे होई पर्यंत त्यांना  8 ते 9 वेळा अटक करण्यात आली होती. कारण हवाईमध्ये राहत असताना तिथे येणारे पर्यटकांचे सोन्याचे दागिने आणि पैशाचे पाकीट मारत असत.त्याच काळात त्यांना घर सोडावे लागले होते. भाडे न भरल्यामुळे त्यांना घर रिकामे करण्याची नोटीस मिळाली होती. रॉक १५ वर्षांचा असताना आर्थिक संकटामुळे त्यांच्या आईने हायवेवर वाहनांसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण कसा तरी रॉक तिथे पोहोचला आणि त्याने आपल्या आईचे प्राण वाचवले. 


1991 मध्ये ते युनिव्हर्सिटी ऑफ मियामीच्या नॅशनल चॅम्पियनशिप संघात होता, नंतर त्यांनी कॅनेडियन फुटबॉल लीगसाठी खेळला सुरुवात केली, खेळातील दुखापतीमुळे काही काळानंतर त्यांनी आपल्या फुटबॉल मधील कारकीर्द थांबवली. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 1995 मध्ये दुखापतीमुळे फुटबॉल करिअर सोडावे लागले तेव्हा खिशात फक्त 7 डॉलर होते. वाढत्या गरिबीमुळे एक दिवस यशाचे शिखर गाठण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याच जिद्दी मुळे आज त्यांच्या प्रॉडक्शन कंपनीचे नाव 7 बक्स एंटरटेनमेंट आहे. 

वडिलांची इच्छा नसून सुद्धा द रॉक यांची व्रेस्टलिंगमध्ये जाण्याची त्यांची आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केले. 4 नोव्हेंबर, 1996 रोजी, द रॉकने दीर्घकाळ प्रयत्नांनंतर WWE साठी करारावर स्वाक्षरी केली आणि सुरुवातीला त्यांचे नाव Rock Maivia असे देण्यात आले होते.


जेव्हा त्यांनी WWE मध्ये सुरुवात केली, तेव्हा लोकांना ड्वेन इतका आवडला नाही, परंतु 14 फेब्रुवारी 1997 रोजी जेव्हा रॉकने एंटरिंग टनेल चॅम्पियनशिपमध्ये ट्रिपल-एचला पराभूत केले तेव्हा त्यांचे नाव टॉप खेळाडूत येवू लागले. 28 एप्रिल 1997 मध्ये दुखापतीमुळे त्यांना बराच काळ रेस्ट घ्यावे लागले, परंतु रॉकने हार मानली नाही आणि त्रासांकडे दुर्लक्ष करून, 2000 मध्ये रॉयल रंबल जिंकून WWE मध्ये परतला.

 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच "That 70's  Show" मध्ये स्वतःच्या वडिलांची भूमिका करून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. 2004 मध्ये  The Rock यांनी "The Scorpion King नावाच्या हॉलिवूडमधील चित्रपटासाठी 5.5 दशलक्ष डॉलर मिळाले जे की नवख्या अभिनेतासाठी सर्वात जास्त चार्ज केले गेले. त्यानंतर 'द ममी रिटर्न्स, द रनडाउन, बी कूल, द गेम प्लान आणि फास्ट अँड फ्युरियस' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी आपले नाव चित्रपट सृष्टीत मोठे केले.


से नाही की ज्यांना लहानपणापासूनच आपले ध्येय माहित तेच शक्य तितक्या उंचीवर पोहोचतात, रॉकला तर उद्या कसे उदरनिर्वाह करायचे आहे हे देखील माहित नव्हते, तो फक्त त्याचे काम इतक्या मेहनतीने आणि समर्पणाने करत असे की यश त्यांच्या चरणी धावून आले. फुटबॉल, कुस्ती नंतर अभिनय क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करून नव्या पिढीसमोर एक आदर्श व्यक्तिमत्वचे उदाहरण बनला आहे.


द रॉक 2016 मधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आणि जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचे  नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. कठोर परिश्रमांबद्दल बोलायचं तर, The Rock  पहाटे ४ वाजता उठून जिम जाऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतो.