adsense

मी आमदार झालो तर.... : Marathi Nibandha

मी आमदार झालो तर....


nibandha marathi
Marathi Nibandha on Aamdar


          शाळेत असल्यापासूनच मला वृत्तपत्र बारकाईने वाचण्याची सवय लागली आणि अगदी माझ्या नकळतच तो माझा आवडता छंद झाला. पण हल्ली अनेक वेळा भ्रष्टाचाराच्या व मोठमोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या बातम्या वाचल्या की, मी अस्वस्थ होतो. अशा वेळी मनात येते की, आपण काहीच करू शकणार नाही का या बाबतीत ?

          पुढच्या वर्षी मी अठरा वर्षांचा होईन. मग मला मतदानाचा हक्क मिळेल. पण तेवढ्याने काय होणार? समाजाच्या राज्याच्या कारभारात काही बदल घडवून आणायचे असतील, तर मला आमदार व्हावे लागेल. विधानसभेत वा लोकसभेत निवडून यायला हवे. अशी निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी मला अजून सात आठ वर्षे घालवायची आहेत. कारण विधानसभेच्या निवडीसाठी पात्र ठरण्यास किमान वय पंचवीस वर्षे आवश्यक आहे. काही हरकत नाही! आताची ही वर्षे मला पूर्वतयारीसाठी हवीच आहेत. पण नंतर पात्र झाल्यावर मी आमदार होणारच.

           निवडून येण्यासाठी राजकारणी लोक काय काय उचापती करतात ! परंतु माझ्या कर्मभूमीतील माझी कामगिरी अशी असेल की, माझे मतदार मला आपण होऊनच निवडून पाठवतील. बॅरिस्टर नाथ पै यांचे चरित्र मी वाचलेले आहे. ते अल्पायुषी ठरले. पण आपल्या कर्मभूमीबद्दल ते एवढे जागरूक असत की, त्यांचे मतदार त्यांना न मागताच मते देत.

           त्याप्रमाणेच मला खात्री आहे की, माझे मतदार मला आपण होऊन निवडून देतील. मी प्रथम लक्ष देईन, ते प्रजाजनांच्या प्रकृतिस्वास्थ्याकडे; त्यासाठी आवश्यक स्वच्छतेकडे. मग त्यांच्या शिक्षणाकडे. लहान मुलांना भावी नागरिकांना ज्याप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आवश्यक आहे, तितकेच प्रौ जनांचे प्रबोधनही आवश्यक आहे. मला जेव्हा जेव्हा शक्य होईल, तेव्हा तेव्हा मी त्यांच्यातील एक होऊन जाईन. म्हणजे मग मी त्यांना परका वाटणार नाही. त्यांच्या अडचणी ते मोकळ्या मनाने माझ्यापुढे मंडतील. वेळोवेळी आयोजित केलेल्या अशा सभा-समारंभामुळे त्यांच्यातही एकोन निर्माण होईल आणि मग बाहेरच्या कुठल्याही नतद्रष्ट व्यक्तीने वा संस्थेने त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला यश मिळणार नाही.

        मी आमदार झालो तर, प्रथम मी भ्रष्टाचार निपटून काढीन. आज भ्रष्टाचाराविना काम होणे ही अशक्य गोष्ट झाली आहे. या भ्रष्टाचारी झगडताना मध्येच आडवी देते ती बेकारी ! खेड्यापाड्यांत घरोघरी चालणारे उदयोगधंदे बंद पडले आहेत. लाखो माणसे बेकार आहेत, ती खेड्यांकडून शहराकडे धाव घेतात आणि मग गर्दी, प्रदूषण, गुन्हेगारी वाढत जाते. मला हा लोंढा थोपवायचा आहे. पुन्हा खेडी हिरवीगार, आरोग्यसंपन्न, नांदी व्हायला हवी आहेत.

           प्रत्येक खेड्याला रस्ते, पाणी व वीज मिळवून द्यायची. ते खेडे गजबजते स्वयंपूर्ण करायचे हे माझे स्वप्न आहे. आमदार झाल्यावर माझी वाटचाल त्या दिशेने असेल. कारण खेडी स्वायत्त झाली की शहरे होतील आणि मग माझा देशही संपूर्णपणे स्वावलंबी बनेल, अशा देशात राष्ट्रीयतेची भावना आपोआप फुलेल. 

          संपूर्ण सुखी, समाधानी भारतभू हे माझे आवडते स्वप्न आहे. ते साध्य करण्यासाठी मला आमदार व्हायला हवेच.

...मराठी निबंध !