मराठी उखाणे :
संतांच्या वाणीत आहे 'सोनियांच्या (ज्ञानाच्या) खाणी',
.... आहेत माझे कुंकूवाचे धनी
नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती, ...... ची झाले आज मी सॉभाग्यवती.
Ukhane in Marathi |
प्रथमभेट ती नजरांची दोन ध्रुवांच्या मिलनाची,
...मुळे त्रुप्त (धुंद)जाहले,अंतरी फुले फुलली प्रीतीची
संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले,
प्रत्यक्षात ...... चे आज मी जीवनसाथी झाले.
ज्योतिबाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,
....च्या सोबत झाले आताच माझे लग्न
साथीने रंगते गाणे, गाण्याने रंगते मैफल,
सखींनो ..... च्या संगतीनं संसार करीन सफल
काव्य आनि कविता सागर आणि सरिता
...चे नाव घेते तुमच्या करिता
कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
........नाव घेयला सुरवात केली आजपासून
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला
संसाराच्या सारीपटावर पडले सॉभाग्याचे पान,
..... चा राहो चोहीकडे मान.
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती
मात्यापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले,
आजच्या दिनी ..... च्या चरणावर जीवनपुष्प वाहिले.
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
.....चे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी
तु्ळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद
माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवात
....रावान्चे नाव घेउन करते संसाराला सूरूवात
हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी,
...चे नाव घेते लग्नाच्या दिवशी
फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती,
....ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती
Ukhane in Marathi