नवरदेवाचे उखाणे :
Ukhane In Marathi |
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
...... चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
पुणे तेथे नाही काही उणे,
.... गेली गावाला तर घर होते सुणेसुणे
सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
….. मिळाली आहे मला अनुरूप
भाजित भाजि पालक,
..... माझि मालकिन अन् मि मालक !
फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
…..चे नाव घेतो सर्वजण ऐका
संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर ……कांता
प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा,
....नी लाडु खावा एक सोबत सगळा
अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले,
.... सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).
वड्यात वडा बटाटावडा, ... नी मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.
अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
.... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे
भाजित भाजी मेथिची ....माझ्या प्रितीची
आंब्यात आंबा हापुस आंबा
..... चे नाव तो तुम्हि थोड थांबा.
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
..... चे नाव आहे लाख रुपये तोळा.
जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
.... नी दिली मला दोन गोड मुले.
हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती,
..... च्या जीवनात सदैव मिळो शांती.
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११,
घराला लावलि घंटी, ...... माझी बबली आणि मी तिचा बंटी
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
..... चे नाव घेतो राखते तुमचा मान
अमुआ कि डाली पर बोले कोयलीया
......के संग बिते सारी उमरिया
वर्षाकाठचे महिने बारा,
....या नावात सामवलाय आनंद सारा.
हो नाही म्हणता म्हणता
लग्नाला संमती दिली
हो नाही म्हणता म्हणता
लग्नाला संमती दिली
आणि ईश्वराच्या साक्षीने ......
माझी झाली.
रोज सकाळि उठुन पितो भरपुर पाणी,
..... चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ…..सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास
रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
..... चे नाव घेते असु द्या लक्षात.
मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ
..... मुळेच माझ्या जीवनाला अर्थ
निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान